MPSC Rajya Seva Mains 2025 Interview Date Extend
MPSC Rajya Seva Interview Date: The Maharashtra Public Service Commission (MPSC) has postponed the State Services Main Examination 2025 interview schedule that was earlier planned for September 21 to 24, 2026, and September 26 and 28, 2026. According to the latest official update, the interviews have been deferred due to administrative reasons. Candidates appearing for the MPSC State Services Main Exam 2025 Interview should note that the revised interview schedule will be announced separately by the Commission. Candidates are advised to regularly check the official MPSC website and upcoming notifications for the new interview dates, timings, and other important instructions. Know More about MPSC Rajya Seva Interview Date at below
MPSC या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी महत्वाची माहिती !! महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षा-२०२५ संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, राज्य सेवा मुख्य परीक्षा-२०२५ साठी पात्र उमेदवारांच्या मुलाखती २१ ते २४ सप्टेंबर २०२६ तसेच २६ आणि २८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रशासकीय कारणास्तव सदर मुलाखतींचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारांनी याची नोंद घ्यावी आणि सध्या निश्चित केलेल्या मुलाखत तारखेनुसार उपस्थित राहण्याचे नियोजन करू नये.
मुलाखतींचा सुधारित कार्यक्रम आयोगामार्फत स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होणाऱ्या पुढील सूचनेकडे लक्ष ठेवावे. सुधारित वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर मुलाखतीची नवीन तारीख, वेळ आणि इतर आवश्यक सूचना तपासणे महत्त्वाचे राहील.